४० गावांत एकाचवेळी महाआरती

४० गावांत एकाचवेळी महाआरती

Published on

४० गावांत एकाच वेळी ''महाआरती''
माघ पौर्णिमेच्या यात्रेचा जल्लोषात जागर
डोंबिवली, ता. ३१ : जया एकादशीच्या मुहूर्तावर श्री मलंगगड परिसरातील ४० गावांमध्ये एकाच वेळी ''महाआरती''चे आयोजन करून माघ पौर्णिमेच्या यात्रेचे बिगुल वाजवण्यात आले. हिंदू मंचचे अध्यक्ष दिनेश देशमुख यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, या उपक्रमाद्वारे परिसरात धार्मिक जागृती आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले.
सायंकाळी ठीक ७ वाजता सर्व ४० गावांतील मंदिरांमध्ये महाआरती झाली. युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहत शिस्तबद्ध वातावरणात सहभाग नोंदवला. ढोके (श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर), आंभे, खरड आणि वसार यांसह एकूण ४० गावांमध्ये भक्तिमय वातावरण होते.
महाआरतीनंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या माघ पौर्णिमेच्या पालखी सोहळ्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. परंपरेनुसार साजरा होणारा हा सोहळा यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवकांचे नियोजन, गर्दीचे व्यवस्थापन आणि गावकऱ्यांचे सहकार्य यावर विविध मंदिरांमध्ये चर्चा करण्यात आली. एकाच वेळी झालेल्या या महाआरतीमुळे श्री मलंग यात्रेचा उत्साह द्विगुणित झाला असून, संपूर्ण परिसर आता भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com