राष्ट्रवादी-महायुतीत काँटे की टक्कर
राष्ट्रवादी-महायुतीत कांटे की टक्कर
खालापूरात उमेदवारांच्या प्रचाराला वेग
खालापूर, ता. ३१ : जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि शिवसेना-भाजप महायुतीसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. २०१७ मध्ये तालुक्यातील जिंकलेल्या तीन जागा यंदा राखण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आहे.
मतदानाची तारीख दोन दिवसांनी पुढे गेल्याने प्रचारासाठी दोन दिवसांचा अधिक कालावधी मिळणार आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील उमेदवार, कार्यकर्त्यांमध्ये सुतकी वातावरण आहे. २०१७ मध्ये तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुसंडी मारली होती. पंचवीस वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेला खालापूर तालुका राष्ट्रवादीने बळकावला होता. चार पैकी तीन जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समितीच्या पाच जागांवर विजय मिळवला होता. वासांबे जिल्हा परिषद गटात यंदा संदीप मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून लढत असून, त्यांना भाजपच्या नेहा पारंगे यांनी आव्हान उभे केले आहे. संदीप मुंडे यांचा सहज विजय होईल असे वातावरण सुरुवातीला होते. मात्र, भाजपने गावोगावी, वाडी वस्तीवर प्रचार आणि पक्षप्रवेश यांचा धडाका लावला आहे.
शिवाय नेहा पारंगे यांना माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि पनवेलचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी असलेला नातेसंबंधाचा फायदा होणार असल्याचा अंदाज जाणकार लावत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे.
आत्करगाव जिल्हा परिषदमध्ये २०१७ ला जवळपास ९०० मतांच्या फरकाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नरेश पाटील यांनी शिवसेनेच्या भाई शिंदे यांचा पराभव केला होता, परंतु या वेळी बदललेले राजकीय गणित, नरेश पाटील आणि भाई शिंदे यांची झालेली युती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आव्हान ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषदेसाठी श्रद्धा साखरे निवडणूक रिंगणात असून, माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील यांच्या स्नुषा रेश्मा पाटील महायुतीकडून निवडणूक लढवीत आहेत. श्रद्धा साखरे यांचे पती अंकित साखरे राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष आहे. तीन महिने आधीपासूनच श्रद्धा साखरे यांचा प्रचार सुरू झाला आहे. त्यामुळे प्रचारात घेतलेली आघाडी फायद्याची ठरेल असे वाटत असतानाच आत्करगाव जिल्हा परिषद गटात मराठा-ओबीसी राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी या ठिकाणी सोपा वाटणारा विजय अखेरच्या टप्प्यात संघर्षमय झाला आहे.
स्पर्धा आयोजकांची चांदी
निवडणुकांमुळे सध्या सुरू असलेला क्रिकेट स्पर्धेच्या हंगामात आयोजकांची चांदी झाली आहे. काही ठिकाणी रखडलेली कामे जोरात सुरू असल्याचे दिसून आले.
फोटो - 126
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

