वैष्णोदेवी मंदिरासमोर ‘खड्ड्यांचा सापळा’

वैष्णोदेवी मंदिरासमोर ‘खड्ड्यांचा सापळा’

Published on

वैष्णोदेवी मंदिरासमोर ‘खड्ड्यांचा सापळा’
टिटवाळा-बल्याणी मार्गावर जीवघेणा प्रवास
टिटवाळा, ता. १ (वार्ताहर) : टिटवाळा रेल्वे स्थानकापासून बनेलीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाची सध्या दुरवस्था झाली असून, हा रस्ता नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. मांडा-टिटवाळा परिसरातील वैष्णोदेवी मंदिरासमोर रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या अवाढव्य खड्ड्यांमुळे दररोज अपघातांची मालिका सुरू आहे. दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि पादचाऱ्यांना या जीवघेण्या प्रवासातून वाट काढावी लागत आहे.

शाळकरी मुलांचा जीव टांगणीला
या रस्त्यालगतच आयईएस गणेशनगर विद्यालय आहे. शाळेत येणारे हजारो विद्यार्थी, पालक, स्कूल बस आणि रिक्षांची या परिसरात मोठी वर्दळ असते. रस्त्यावरील खोल खड्ड्यांमुळे स्कूल बस आणि रिक्षा उलटण्याची भीती निर्माण झाली असून, चिमुकल्यांचा जीव धोक्यात आला आहे. या ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी अनेक अपघात घडत आहेत.

प्रशासनाची टोलवाटोलवी
विशेष म्हणजे हा मार्ग टिटवाळा स्थानक, बाजारपेठ आणि शाळांना जोडणारा मुख्य दुवा आहे. रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे हा रस्ता अधिक धोकादायक ठरत आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन केवळ पाहणीचे आश्वासन देत असून, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल रहिवासी विचारत आहेत.

आंदोलनाचा इशारा
मार्गावरील खड्डे तातडीने बुजवून कायमस्वरूपी डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी जनता हित फाउंडेशनचे अध्यक्ष रितेश कांबळे आणि सचिव नियाज शेख यांनी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com