शहीद जवानांच्या स्मृतींना मॅरेथॉनद्वारे मानवंदना

शहीद जवानांच्या स्मृतींना मॅरेथॉनद्वारे मानवंदना

Published on

शहीद जवानांच्या स्मृतींना मॅरेथॉनद्वारे मानवंदना
३,०००हून अधिक नागरिकांचा सहभाग; सी. एन. पाटील फाउंडेशनचा उपक्रम
कल्याण, ता. १ (वार्ताहर) : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सी. एन. पाटील फाउंडेशन आणि फेडरेशन ऑफ ऑर्गन डोनेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद जवान संदीप पांडुरंग गायकर आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या इतर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मॅरेथॉनचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून, यात तीन हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवत शहिदांच्या स्मृतींना उजाळा दिला. सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद कल्याण, ठाणे आणि लगतच्या जिल्ह्यांतील युवक-युवती, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे कल्याणमधील विविध पोलिस ठाण्यांतील पोलिस बांधव आणि त्यांच्या मुलांनीही या स्पर्धेत धावून शहिदांना मानवंदना दिली.
सी. एन. पाटील फाउंडेशनने आतापर्यंत ११ शहीद जवानांच्या कुटुंबीयांना कल्याणमध्ये सन्मानाने बोलावून त्यांचे सत्कार केले असून, त्यांना आर्थिक मदतही सुपूर्द केली आहे. केवळ क्रीडा स्पर्धाच नव्हे, तर देशसेवा करणाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम शहरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अमर वाघमोडे, माजी आमदार नरेंद्र पवार, नगरसेविका हेमलता पवार, नगरसेवक वरुण पाटील, मच्छिंद्र जाधव, डॉ. प्रशांत पाटील, श्रीकांत फुलवणे, डॉ. कोमल भोईर, एन. पी. अय्यर आणि फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com