गुलमोहरचे अवाढव्य झाड कोसळले
डोंबिवलीत अवाढव्य गुलमोहर कोसळले
महावितरणचे मोठे नुकसान; वीजपुरवठा खंडित
डोंबिवली, ता. १ (वार्ताहर) : डोंबिवली एमआयडीसी परिसरातील मिलापनगर तलावाजवळ शनिवारी (ता. ३१) दुपारी एकच्या सुमारास एक अवाढव्य गुलमोहरचे झाड महावितरणच्या ट्रान्स्फॉर्मरवर कोसळले. या घटनेत महावितरणच्या उच्च दाबाच्या वाहिन्या तुटून खाली आल्या असून, काही विद्युत खांबही वाकले आहेत. झाड कोसळल्यामुळे संपूर्ण निवासी विभागातील वीजपुरवठा खंडित झाला असून, नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीच्या ठेकेदाराकडून सध्या परिसरात नवीन गटारांचे काम सुरू आहे. या कामासाठी करण्यात आलेल्या खोल खोदाईमुळे झाडाची मुळे कमकुवत झाली आणि हे अवाढव्य झाड कोसळले, अशी दाट शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. सुदैवाने, झाड कोसळले त्या वेळी रस्त्यावरून कोणतेही वाहन किंवा नागरिक जात नसल्याने मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत झाड कापून बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले.
नागरिकांचा संताप
राजू नलावडे या घटनेबाबत सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, एमआयडीसीच्या ठेकेदाराच्या माणसांनी केलेल्या अक्षम्य चुकीमुळेच हे झाड कोसळले आहे. यापूर्वीही अनेकदा चुकीच्या पद्धतीने खोदकाम केल्यामुळे झाडे, वीज आणि पाण्याच्या वाहिन्यांचे नुकसान झाले आहे. अशा बेजबाबदार कंत्राटदारांवर प्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. झाड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे बंद करण्यात आली होती. महावितरणचे कर्मचारी वाकलेले खांब आणि तुटलेल्या वाहिन्या दुरुस्त करण्याचे काम करत असून, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

