ठाकरे सेनेसाठी अस्तित्वाची लढाई

ठाकरे सेनेसाठी अस्तित्वाची लढाई

Published on

खालापुरात ठाकरे गटासाठी अस्तित्वाची लढाई
खालापूर, ता. १ (बातमीदार) ः शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या खालापूर तालुक्यात यंदा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत शिंदे गट आणि ठाकरे गटाची कसोटी लागणार आहे. ठाकरे गटासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.
चारही जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणांत सर्व उमेदवार निवडून आणून खालापूर तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे शिवसैनिकांनी अनेकदा दाखवून दिले. मात्र २०१७च्या निवडणुकीत या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला होता. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. विभाजनानंतर सर्व प्रमुख वजनदार नेते शिंदे गटात गेल्यानंतरही ग्रामीण भागात ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते मशाल हातात घेऊन लढा देत आहेत.
ठाकरे गट तालुक्यात अजित पवार गट, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस यांच्यासोबत परिवर्तन आघाडीत एकत्र आहे. शिवसेनेचा कायम बालेकिल्ला राहिलेला चौक जिल्हा परिषद गटात ठाकरे गटाने उमेदवार दिला असून, परिवर्तन आघाडीसोबत असल्याने या ठिकाणी भाजपला मोठी टक्कर मिळत आहे. याशिवाय चार पंचायत समिती गणांपैकी चौक, वासंबे, वाशिवली आणि सावरोली गटात ठाकरे गटाने उमेदवार उभे केले आहेत. परिवर्तन आघाडीची साथ ठाकरे गटाला पूर्णपणे मिळाल्यास तालुक्यात मशाल पेटती राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com