आंबेवाडी जि.प.माजी सदस्य 
 दयाराम पवार यांची घरवापसी

आंबेवाडी जि.प.माजी सदस्य दयाराम पवार यांची घरवापसी

Published on

आंबेवाडी दयाराम पवार यांची घरवापसी
रोहा, ता. ३१ (बातमीदार) ः जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देऊन शिंदे गटात गेलेले आंबेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघाचे माजी सदस्य दयाराम पवार यांची पुन्हा घरवापसी झाली आहे. यामुळे मंत्री भरत गोगावले यांना राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.
दयाराम पवार यांनी माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोलाड येथील अंबरसावंत मंदिर येथे या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर दयाराम पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यान शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे पारडे जड झाले असल्याचे बोलले जात आहे. या पक्ष प्रवेश कार्यक्रमप्रसंगी जिल्हा परिषद उमेदवार निधी जाधव, पंचायत समिती उमेदवार संजय मांडलुस्कर व जगन्नाथ धनावडे, युवा नेते राकेश शिंदे, नरेंद्र जाधव राजेश कदम, उत्तम बाईत व आंबेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटॊ कॅप्शन: दयाराम पवार यांचे राष्ट्रवादी स्वागत करताना अनिकेत तटकरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com