कला-क्रीडा महोत्सवाचे आयोजन

कला-क्रीडा महोत्सवाचे आयोजन

Published on

कला-क्रीडा महोत्सवाचे आयोजन
महिला क्रिकेट, नृत्य स्पर्धांसह मैदानी स्पर्धांची रेलचेल

कासा, ता. १ (बातमीदार) : आमदार कॉ. विनोद निकोले यांच्या सौजन्याने व डहाणू-तलासरी तालुका कला-क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डहाणू-तलासरी तालुका कला-क्रीडा महोत्सव २०२६ हा १ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत विविध स्पर्धांनी रंगतदार ठरणार आहे. तालुक्यातील युवक-युवती, महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांची भरगच्च मेजवानी या महोत्सवात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या कला-क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि युवकांमध्ये आरोग्यदायी स्पर्धात्मक भावना निर्माण करणे हा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आमदार कॉ. विनोद निकोले यांनी केले आहे. या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, उपविभागीय पोलीस अधिकारी (उपविभागीय पोलीस अधिक्षक) अंकिता कणशे, नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी, तहसीलदार सुनील कोळी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------
चौकट
अंतिम दिवशी विशेष आकर्षण
या कला-क्रीडा महोत्सवाच्या अंतिम दिवशी म्हणजेच ४ फेब्रुवारी रोजी बस डेपोजवळ महिला क्रिकेट (खुला गट) आणि नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यात १०० मीटर धावणे, गोळाफेक, लंगडी (इ. १ ली ते ५ वी), लंगडी (खुला गट), विटी-दांडू, महिलांसाठी पारंपरिक पैठणी खेळ यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com