स्कुटीच्या तपासणीवेळी सापडला हायड्रो गांजा
पनवेल, ता. १ (वार्ताहर) : वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे अमली पदार्थांची विक्री करणारा एक तरुण जाळ्यात सापडला आहे. केतन गिरीश मालू (वय २२) याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्याजवळ सापडलेला गांजा, वजनकाटा व स्कुटी जप्त केली आहे. केतनचा मित्र विनाहेल्मेट स्कुटी चालवून घेऊन जात असल्याने वाहतूक पोलिसाने त्याला थांबवले असता, त्याच्या स्कुटीच्या डिक्कीत हायड्रो गांजा आणि वजनकाटा आढळून आला. त्यानंतर कारवाई करण्यात आली.
२९ जानेवारीला रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पनवेलच्या डॉ. आंबेडकर पुतळा चौकात वाहतूक पोलिस राकेश राजपूत कर्तव्यावर होते. या वेळी त्यांना कार्तिक तेवर हा तरुण विनाहेल्मेट स्कुटीवरून जाताना दिसला. त्यामुळे राजपूत यांनी त्याला थांबवून हेल्मेटबद्दल विचारले असता, त्याने ते डिक्कीत असल्याचे सांगितले. राजपूत यांनी त्याला हेल्मेट घालून जाण्यास बजावले. कार्तिकने हेल्मेट घेण्यासाठी डिक्की उघडली असता, त्यातून उग्र वास आला. राजपूत यांनी डिक्कीची तपासणी केली असता, एका पिशवीत २४ छोट्या पाकिटांमध्ये गांजा भरलेला आढळून आला. कार्तिकने स्कुटी त्याचा मित्र केतन मालू याची असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी केतनला तातडीने त्या ठिकाणी बोलावून घेतले. डिक्कीमधील हायड्रो गांजा त्यानेच यश नावाच्या व्यक्तीकडून विक्रीसाठी आणल्याचे केतनने कबूल केले.
दीड लाखाचा मुद्देमाल जप्त
वाहतूक पोलिसांनी केतनला गांजा व स्कुटीसह ताब्यात घेऊन पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानुसार पोलिसांनी केतनविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तसेच त्याच्या स्कुटीमध्ये सापडलेला २९ ग्रॅमचा गांजा, एक डिजिटल वजनकाटा, आयफोन आणि स्कुटी असा एकूण दीड लाखा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

