रीटेल क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत ठोस उपाय हवे होते

रीटेल क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत ठोस उपाय हवे होते

Published on

रिटेल क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत ठोस उपाय हवे होते
अर्थसंकल्पाबाबत मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांचे मत

मुंबई, ता. १ : भारतीय अर्थव्यवस्था पुढील दोन-तीन वर्षांतच जगातील तिसरी मोठी अर्थसत्ता बनू शकेल. तशा संधीही आपल्याला चालून आल्या आहेत. ब्रिटन, न्यूझीलंड, संयुक्त अरब अमिरात, युरोपीय महासंघ यांच्याशी झालेल्या व्यापारी करारांमुळे निर्यातवाढीत मोठी झेप अपेक्षित आहे. मात्र त्याचवेळी अनिवासी भारतीयांकडून भारतात गुंतवणुकीला प्रोत्साहनाबाबत तसेच भारतातील रिटेल क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याबाबत ताज्या अर्थसंकल्पात ठोस उपाय हवे होते, अशी अपेक्षा अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्सचे अध्यक्ष व मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी व्यक्त केली. रविवारी जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत दातार यांनी प्रतिक्रिया दिली.
दातार पुढे म्हणाले, की भारतातील प्रचंड लोकसंख्येच्या तुलनेत तसेच रिटेल बाजारपेठही प्रचंड उलाढालीची असताना या क्षेत्रात व्यावसायिकांची संख्या अद्याप पुरेशी नाही. भारतीय परदेशात जाऊन व्यवसाय करतात, पण देशात मात्र मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत नाही. परदेशाच्या तुलनेत स्थानिक वेतनमानही आकर्षक नसते. यावर उपाय म्हणून सरकारने अनिवासी भारतीय व आंतरराष्ट्रीय व्यवसायांना भारतीय रिटेल क्षेत्रात आकर्षित करून करसवलती दिल्यास तसेच परकी थेट गुंतवणुकीस (एफडीआय) प्रोत्साहन दिल्यास येथे नव्या नोकऱ्या आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील, कर्मचाऱ्यांना चांगले वेतनही मिळेल आणि व्यावसायिकांची संख्या वाढल्यास स्पर्धात्मकतेमुळे वस्तूंच्या किमती कमी होऊन सर्वसामान्यांना वस्तू स्वस्तात मिळतील. अनेक अनिवासी भारतीय जगभरात उत्तम व्यवसाय करतात, पण भारतात गुंतवणुकीस राजी होत नाहीत. हे चित्र बदलणे गरजेचे आहे, असे दातार म्हणाले.

करांचे ओझे कमी करावे!

भारतीय अर्थव्यवस्थेला प्रचंड ताकद देण्याचे सुप्त सामर्थ्य रिटेल क्षेत्रात आहे. परंतु भारतात एकतर या क्षेत्रात खूप कमी व्यावसायिक आहेत आणि जे आहेत ते उच्च करांच्या दडपणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सक्षमतेने स्पर्धा करू शकत नाहीत. त्यावर उपाय म्हणून सरकारने हे व्यावसायिक व सर्वसामान्यांवरील करांचे ओझे कमी करावे आणि अनिवासी भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय व्यवसायांना भारतातील रिटेल क्षेत्रात थेट गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन द्यावे.

फोटो - 347

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com