गोदामातील साहित्याची राखरांगोळी

गोदामातील साहित्याची राखरांगोळी

Published on

गोदामातील साहित्याची राखरांगोळी
बोईसर, ता. ८ (वार्ताहर): येथील धनानी नगरजवळील यादवनगर परिसरात मुख्य रस्त्यालगतच्या लाकडी गोदामाला शनिवारी पहाटे ४.३० च्या सुमारास आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी इमारतीच्या बांधकामासाठीचे साहित्य जळून खाक झाले आहे.
या गोदामात औद्योगिक वापरासाठीच्या लाकडी पट्ट्या तसेच बांधकामासाठी लागणाऱ्या सेंट्रिंग साहित्य साठवण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी दोन गाड्या तसेच ‘टॅप्स’ची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली होती. काही वेळाच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
-------------------------------------
मानवी वस्तीला धोका
मुख्य रस्त्यालगत, वस्तीच्या जवळ अशा प्रकारे साहित्य साठवले जात असल्याने भविष्यात अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर प्रशासनाने संबंधित गोडाऊनच्या सुरक्षिततेबाबत तपासणीची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com