

पाणीटंचाईवरून शिवसेना आक्रमक
विरार पूर्वेतील समस्येवरून अतिरिक्त आयुक्तांनी निवेदन
विरार, ता. ११ (बातमीदार) ः विरार पूर्वेतील चंदनसार, भाटपाडा, सहकारनगर, फुलपाडा, मनवेलपाडा, कारगिलनगरसारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरात दोन वर्षांपासून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख सुदेश चौधरी यांनी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांची भेट घेऊन प्रशासनाला धारेवर धरले.
सहा-सहा दिवसांआड पाणी येत असल्याने हैराण झालेल्या नागरिकांना महागड्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर चौधरी यांनी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या दालनात बैठक घेतली. या वेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र ठाकरे यांना पाचारण करण्यात आले. पापडखिंड धरणातून सहकारनगरमध्ये ३०० मिमी व्यासाची जलवाहिनी जोडली गेलेली नसल्याने याबाबत प्रशासनाला विचारणा करण्यात आली. तसेच पालिका प्रशासन केवळ ठेकेदारांच्या मर्जीवर चालत असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला. वाढत्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे अमृत-२ योजनेतील प्रलंबित कामे पूर्ण करावीत, अशी मागणी त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.