अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या मुलाची सुटका

अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या मुलाची सुटका

Published on

विशाखा सुभेदार यांनी घेतली
एकनाथ शिंदेंची भेट

ठाणे, ता. १५ : युद्धजन्य परिस्थितीमुळे कुवेतमध्ये अडकलेला अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय मायदेशी सुखरूप परतला आहे. त्याच्या सुटकेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य शासनाने पाठपुरावा केला होता. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या तत्पर मदतीमुळे मुलगा परतल्याची भावना व्यक्त करत अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी आज भेट घेत त्यांचे आभार मानले.
विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय हा एका खासगी कंपनीत कामासाठी कुवेतला गेला होता. कंपनीकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने आणि पासपोर्टशी संबंधित अडचणींमुळे तो तिथे अडकून पडला होता. या कठीण काळात विशाखा सुभेदार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. शिंदे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेतमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. अखेर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अभिनयची सुटका करण्यात आली. मुलाच्या सुटकेनंतर विशाखा सुभेदार यांनी ठाणे येथील निवासस्थानी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ‘‘एक आई म्हणून मी खूप हतबल झाले होते, पण उपमुख्यमंत्र्यांनी मोठ्या भावासारखी साथ दिली. त्यांनी केलेल्या मदतीमुळेच माझा मुलगा आज सुखरूप घरी परतला आहे,’’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com