भुवनेश्वर येथे प्रणव देसाईची दुहेरी सुवर्ण कामगिरी

भुवनेश्वर येथे प्रणव देसाईची दुहेरी सुवर्ण कामगिरी

Published on

प्रणव देसाईची दुहेरी सुवर्ण कामगिरी
ठाणे, ता. २४ : राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाण्याच्या प्रणव देसाईने दमदार कामगिरी करत दुहेरी सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. १०० आणि २०० मीटर शर्यतीत वैयक्तिक प्रकारात त्याने हे यश प्राप्त केले आहे.
भुवनेश्वर येथे १७ ते २१ मार्चदरम्यान २४ वी राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. यामध्ये प्रणव देसाईने १०० आणि २०० मीटर शर्यतीत वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत दुहेरी सुवर्णपदकांची कमाई केली. तर, प्रणवने नवी दिल्लीत झालेल्या दुसऱ्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेतही १०० आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत दुहेरी सुवर्णपदक पटकावले. प्रत्येक स्पर्धेसोबत माझा आत्मविश्वास वाढत आहे. विशेषतः २०० मीटरमध्ये मी माझी वेळ सुधारू शकलो, यामुळे पुढील स्पर्धांसाठी मला मोठा आत्मविश्वास मिळाला आहे, असे मत प्रणवने व्यक्त केले. प्रशिक्षक निलेश पाटकर यांनीही प्रणवच्या कामगिरीचे कौतुक करत, हंगामाच्या सुरुवातीलाच ही उत्कृष्ट कामगिरी असल्याचे सांगितले. या यशाबद्दल मीनल पालांडे आणि टीएमसीएपीवाय चे योजना प्रमुख अशोक आहेर यांनी प्रणव व त्याच्या पालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com