गर्भवतीला नोकरी सोडण्यास सांगणे क्रौर्य  नाही

गर्भवतीला नोकरी सोडण्यास सांगणे क्रौर्य  नाही
Published on

गर्भवतीला नोकरी सोडण्यास
सांगणे क्रौर्य  नाही ः न्यायालय
मुंबई, ता. २६ : गर्भवती सुनेला नोकरी सोडण्याचा सल्ला देणे म्हणजे क्रौर्य नव्हे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुलुंड महादंडाधिकारी न्यायालयाने दिला. तसेच तक्रारकर्तीच्या पती व सासूसह पाच जणांची आरोपातून निर्दोष सुटका केली. 
सासूने सुनेला गर्भवती असल्यामुळे प्रवास टाळावा आणि नोकरी सोडण्याचा सल्ला दिला होता. या सल्ल्यामध्ये जबरदस्ती किंवा दबावाचा हेतू दिसत नाही. त्यामुळे हा सल्ला क्रौर्याच्या व्याख्येत मोडत नाही, असे मुलुंड न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी एन. जी. व्यास यांनी नमूद केले. तसेच मुलीच्या जन्मानंतर सुनेला नोकरी करण्यास मज्जाव केल्याचे कोणतेही ठोस पुरावे प्राथमिक माहिती अहवालात (एफआयआर) आढळून आलेले नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आणि आरोपींची क्रौर्याच्या आरोपांतून निर्दोष सुटका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com