हाॅटेल सहारा स्टारचा पाणीपुरवठा खंडित

हाॅटेल सहारा स्टारचा पाणीपुरवठा खंडित
Published on

हाॅटेल सहारा स्टारचा पाणीपुरवठा खंडित

मुंबई, ता. २७ : मालमत्ता कर थकबाकीदारांवर मुंबई महापालिकेने कारवाईचा कठोर बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.‌ विलेपार्ले येथील सहारा स्टार हॉटेलवर मोठी कारवाई करत येथील पाणीपुरवठा खंडित केला आहे. हॉटेल व्यवस्थापनाकडे सुमारे ४१ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकबाकी असल्याचे समोर आले आहे. सहारा स्टार हॉटेलकडून गेल्या अनेक वर्षांपासून मालमत्ता कर भरला गेलेला नव्हता. याबाबत पालिका वारंवार नोटिसा देऊनही हॉटेल व्यवस्थापनाने थकबाकीची रक्कम भरली नाही. अखेर पालिकेने शुक्रवारी कठोर पाऊल उचलत हॉटेलचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत मालमत्ता कर आहे. चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करातून ७,३६८ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापैकी आतापर्यंत सुमारे ६,६०० कोटी रुपयांची वसुली झाली आहे. पुढील चार दिवसांत ७,३६८ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com