किन्नर समाजाचा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश

किन्नर समाजाचा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश
Published on

भिवंडी, ता. ९ (वार्ताहर) : भिवंडीतील रामनगर डोंगरपाडा परिसरात राहणाऱ्या किन्नर समाजातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश करून राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभागाची नवी दिशा स्वीकारली आहे. महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला पक्षाच्या पदाधिकारी सबीना नूर अली, खुशी यादव, मोनालिसा केने, दुर्गा यादव, रोशनी गुप्ता यांच्यासह किन्नर समुदायातील अनेक सदस्य आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी स्वाती कांबळे यांनी, राष्ट्रवादीतर्फे तृतीयपंथी समाजासाठी विशेष सेल स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. या माध्यमातून सरकारच्या विविध कल्याणकारी योजना या समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आवश्यक असून, त्यासाठी पक्ष कटिबद्ध आहे. किन्नर समाजाच्या या सहभागामुळे सामाजिक मुख्य प्रवाहात त्यांचे प्रतिनिधित्व अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खुशी तिवारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com