कुणाल कामरा

कुणाल कामरा
Published on

सुधारित याचिकेसाठी
कामराला परवानगी 

सहयोग पोर्टलविरोधात उच्च न्यायालयात धाव

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ९ : ‘सहयोग पोर्टल’ आणि माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल माध्यम आचारसंहिता) नियमांत २०२५मध्ये केलेल्या दुरुस्तीला हास्यकलाकार कुणाल कामरा आणि वरिष्ठ वकील हरेश जगतियानींनी आव्हान दिले आहे. आक्षेपार्ह मजकूर हटवण्याबाबतच्या कालावधीबाबत केंद्र सरकारने नियमांत सुधारणा केली असून, त्यालाही आव्हान देता यावे यासाठी याचिकेत सुधारणा करण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ९) दोघांनाही मान्यता दिली.

 याचिका न्यायप्रविष्ट असताना आक्षेपार्ह मजकूर डिजिटल माध्यमावरून हटवण्याचा कालावधी तीन तासांवर आणण्याबाबत केंद्राच्या नियमांत नव्याने सुधारणा केली आहे. परिणामी, आक्षेपार्ह म्हणून हजारो मजकूर डिजिटल माध्यमावरून काढून टाकले जात आहेत. पोलिस अधिकारी कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर निर्णयाशिवाय विशिष्ट मजकूर त्यांना बेकायदा वाटतो म्हणून हटवण्याचे एकतर्फी आदेश देत असल्याचे याचिकाकर्त्यांनी मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाला सांगितले. नियमांतील नव्या सुधारणेलाही आव्हान देण्यासाठी याचिकेत सुधारणा करण्यास परवानगी देण्याची मागणी केली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने सुधारित याचिका करण्याची कामरा आणि जगतियानी यांची मागणी मान्य केली.  
दरम्यान, माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील २०२५मध्ये केलेल्या दुरुस्तीच्या घटनात्मक वैधतेला कामरा आणि जगतियानी यांनी फेब्रुवारीत आव्हान दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com