

ठाणे, ता. २० : आमदारांप्रमाणे ठाणे महापालिकेतील नगरसेवकांनाही पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी माजी महापौर तथा विद्यमान नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी केली आहे. नगरसेवकांना कार्यकाळात निश्चित पगार नसतो, तसेच निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षेचा अभाव जाणवतो. त्यामुळे किमान दोन टर्म पूर्ण केलेल्या नगरसेवकांना पेन्शन योजना लागू करण्याबाबत धोरण आखावे, अशी विनंती शिंदे यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात शिंदे यांनी यापूर्वीही २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली होती. आता पुन्हा त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत महापौरांना सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. नगरसेवक हे प्रभागातील विकासकामे, नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. अनेक वेळा स्वतःचा वेळ व आर्थिक खर्च करून ते कामे पूर्ण करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
नगरसेवकांना निश्चित मानधन किंवा निवृत्तीनंतर आर्थिक आधार नसल्याने अनेक जण पूर्णवेळ सार्वजनिक कामात गुंतूनही आर्थिक अडचणींना सामोरे जातात. काही राज्यांमध्ये माजी नगरसेवकांना निवृत्तिवेतनाची तरतूद असल्याचा दाखला देत ठाण्यातही अशी योजना लागू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मात्र, ही योजना राबविताना महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करून आवश्यक अटी व शर्ती निश्चित करणे गरजेचे आहे. यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून सरकारची मान्यता घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.