एप्रिल हिटने विक्रमगड तापले

एप्रिल हिटने विक्रमगड तापले
Published on

उकाड्याने जीव नकोसा
विक्रमगड परिसराला उष्णतेचा फटका
विक्रमगड, ता. २३ (बातमीदार) : परिसरात एप्रिलच्या सुरुवातीपासूनच उष्णतेचा पारा सातत्याने वाढत आहे. दुपारच्या वेळेत तापमानात लक्षणीय वाढ होत असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.
तालुक्यातील ग्रामीण भागातही उष्णतेचा परिणाम जाणवत आहे. काही ठिकाणी पाणीटंचाईची समस्या डोकेवर काढू लागली आहे. विहिरी, कूपनलिकांमधील पाणीपातळी घटल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वाढत्या तापमानामुळे शेतीकामांवरही परिणाम झाला आहे. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक थंड पेयांकडे वळले आहेत. गावोगावी, गल्लीबोळांत सरबत, उसाचा रस तसेच आयस्क्रीम, पेप्सी, इतर थंड पेयांची मागणी वाढली आहे. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांनी याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. अतिउष्णतेमध्ये वारंवार थंड पेयांचे सेवन केल्यास सर्दी, खोकला, तापासारख्या आजारांचा धोका आहे. त्यामुळे पुरेसे पाणी पिणे, घराबाहेर पडताना हलका आहार घेण्याचा सल्ला सल्ला देण्यात येत आहे.
--------------------
पाणीटंचाईचे संकट
अचानक वाढलेल्या तापमानामुळे विक्रमगड तालुक्यातील नागरिक उकाड्याचा सामना करत आहेत. प्रशासनाने पाणीटंचाई परिस्थितीकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com