स्टील मार्केट करप्रकरणी महादेव वाघमारे यांचे विधान मागे

स्टील मार्केट करप्रकरणी महादेव वाघमारे यांचे विधान मागे
Published on

स्टील मार्केट करप्रकरणी महादेव वाघमारे यांचे विधान मागे
व्यापाऱ्यांनी कायद्याचे पालन करण्याचे आवाहन
पनवेल ता. २४ (बातमीदार) ः जून महिन्यापर्यंत स्टील मार्केटमधील व्यापाऱ्यांनी मालमत्ता कर भरू नये, असे आवाहनवजा विधान परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी केले होते. मात्र, त्यांनी आपली ही भूमिका मागे घेत व्यापाऱ्यांनी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. यासंदर्भात त्यांनी दैनिक सकाळला पत्र पाठवून मालमत्ता कराबाबत दिलेली प्रतिक्रिया मागे घेतली असून, दिलगिरीही व्यक्त केली आहे.
सोमवारी (ता. २०) प्रसिद्ध झालेल्या बातमीत स्टील मार्केटमधील व्यापाऱ्यांनी मालमत्ता कर भरू नये, असे माझे विधान उच्च न्यायालयाच्या आदेश किंवा निर्देशाशिवाय प्रसिद्ध झाले, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सदर बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून, त्यानुसार उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने, व्यापाऱ्यांनी कर भरू नये हे माझे आवाहन मी यथास्थित मागे घेत आहे, असे महादेव वाघमारे यांनी सकाळला दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
वाघमारे यांनी नागरिक व व्यापाऱ्यांना आवाहन करताना म्हटले की, सर्वांनी लागू असलेल्या कायद्यांचे पालन करावे आणि महानगरपालिकेच्या नियमांनुसार कर भरावा. त्यांच्या विधानामुळे निर्माण झालेल्या गैरसमजाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com