

मासेमारी नौकांसाठी धोक्याची घंटा
तेल कंपनीच्या फलाटामुळे अपघाताची भीती
भाईंदर, ता. १० (बातमीदार) : अरबी समुद्रातील तेल कंपनीचा फलाट रात्रीच्या वेळी निर्मनुष्य असल्याने मासेमारी जाणाऱ्या नौकांसाठी त्रासदायक ठरत आहे. या फलाटामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अरबी समुद्रातील मुंबई हाय परिसरात तेल उत्खनन करणाऱ्या कंपनीचा एक निर्मनुष्य फलाट आहे. या फलाटावर वीज, चेतावणी दिवे, रेडियम मार्किंग अथवा इतर सागरी सुरक्षा व्यवस्था कार्यरत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेस मासेमारी नौका, बोटी, इतर सागरी वाहतूक करणाऱ्या नौकांना हा फलाट दिसत नाही. परिणामी, भविष्यात मोठा सागरी अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---------------------
उत्तनचे खलाशी बचावले
उत्तन डोंगरी चौक येथील मासेमारी नौका ७ मे रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास मासेमारी करून किनाऱ्याकडे परतत असताना फलाटाच्या अगदी जवळ पोहोचली; मात्र नौका चालवणाऱ्याने प्रसंगावधान राखून तत्काळ दिशा बदलल्यामुळे अपघात टळला. या घटनेमुळे नौकेवरील सर्व खलाशी भयभीत झाले होते, अशी माहिती पाली उत्तन मच्छीमार सहकारी संस्थेचे संस्थापक बर्नड डिमेलो यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.