अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Published on

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

भाईंदर, ता. १४ (बातमीदार) : भाईंदर पूर्व येथे एका १३ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडिता २८ एप्रिलला आपल्या मित्राच्या घरी गेली होती. त्या वेळी मित्राचा आणखी एक मित्र त्या ठिकाणी होता. त्याने पीडितेवर बळजबरीने अत्याचार केले. पोलिसांना सांगितले तर जीवे मारण्याची धमकी त्याने तिला दिली. त्यानंतर अत्याचार करणाऱ्याने पीडितेला १२ मे रोजी पुन्हा भेटायला बोलावले. नाही आली तर तुला बघून घेईन, अशी धमकी त्याने पीडितेला दिली. त्याची माहिती पीडितेने आईला दिली. त्यानंतर पीडितेच्या आईने बुधवारी (ता. १३) नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला असून पीडितेच्या मित्राला अटक केली आहे तर अत्याचार करणाऱ्याचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com