खारघरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

खारघरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Published on

खारघरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
आरोपीवर ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल

नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) ः खारघरमध्ये राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाने १७ वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले. या संबंधातून ही मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. याप्रकरणी खारघर पाेलिस ठाण्यात आशिक जाधव (वय २४) याच्याविरुद्ध बलात्कारासह पाेक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
जाधव याने या मुलीसोबत १५ एप्रिल आणि त्यानंतर अनेक वेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. या संबंधातून पीडित मुलगी सहा आठवड्यांची गरोदर राहिली. तिच्या पोटात दुखू लागल्याने दोन दिवसांपूर्वी ती आईसाेबत दवाखान्यात गेली. तेथे तपासणीत हा प्रकार उघड झाला. त्यानंतर डॉक्टरांनी याबाबतची माहिती खारघर पोलिसांना दिली. पोलिसांनी पीडित मुलीकडे केलेल्या चाैकशीनंतर जाधव याने वारंवार अत्याचार केल्याचे तिने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com