नमुंमपा प्रभाग समित्यांतील स्वीकृत सदस्यांची नियुक्ती रखडली

नमुंमपा प्रभाग समित्यांतील स्वीकृत सदस्यांची नियुक्ती रखडली
Published on

प्रभाग समित्यांतील स्वीकृत सदस्यांची नियुक्ती रखडली
वाशी, ता. २२ (बातमीदार) ः नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीला जवळपास पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला असून, नव्याने निवडून आलेल्या सभागृहाच्या स्थापनेलाही तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. पालिकेच्या विविध विषय समित्यांसह शहरातील आठही प्रभाग समित्यांची स्थापना केली. मात्र, या प्रभाग समित्यांमध्ये नियुक्त करण्यात येणाऱ्या स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. यामुळे स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पालिका अधिनियमातील तरतुदीनुसार प्रभाग समित्यांमध्ये संबंधित नगरसेवकांसोबत विभाग अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्था व समुदाय आधारित संस्थांमधून तीनपर्यंत स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करता येते. या सदस्यांच्या माध्यमातून स्थानिक समस्यांवर नागरिकांचा थेट सहभाग वाढविण्याचा उद्देश आहे. नवी मुंबई पालिकेच्या समित्यांची स्थापना केली तरी स्वीकृत सदस्यांची निवड केलेली नाही. त्यामुळे प्रभाग स्तरावरील अनेक प्रश्न, नागरिकांच्या सूचना आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधित्व यांना व्यासपीठ मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. यासंदर्भात सचिव संघरत्ना खिल्लारे यांच्याशी संपर्क साधला असता नवी मुंबई पालिकेच्या दोन्ही परिमंडळला स्वीकृत प्रभाग सदस्यांची नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रकिया सुरू करण्याचे सूचित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com