उल्हासनगरात मोहरममूळे पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल,

उल्हासनगरात मोहरममूळे पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल,
Published on

उल्हासनगरात मोहरममूळे
पाणीपुरवठ्यात बदल
शुक्रवारी रात्रीपासून ते रविवार रात्रीपर्यंत पाणी बंद

उल्हासनगर, ता. २३ (बातमीदार) ः महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने उल्हासनगरात मोहरममूळे पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल केला आहे. त्यानुसार, बुधवार ते शुक्रवार पाणी सुरू राहणार असून, शुक्रवारी (ता. २६) रात्री १२ वाजल्यापासून ते रविवारी (ता. २८) रात्री १२ वाजेपर्यंत पाणी बंद राहणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी दिली.
महापालिकेने एमआयडीसीच्या बारवी, जांभूळ व शहाड जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा बुधवारी (ता. २४) रात्री १२.०० वाजल्यापासून ते शुक्रवारी (ता. २६) रात्री १२.०० वाजेपर्यंत बंद राहणार असल्याबाबत पूर्व सूचना दिली होती. मात्र, शुक्रवारी (ता. २६) रोजी मोहरम सण असल्याने या आठवड्यातील पाणीकपातीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे. त्यानुसार जांभूळ व शहाड जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी (ता. २६) रात्री १२ वाजल्यापासून ते रविवारी (ता. २८) रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com