

सांगा सरकार, जगायचं कसं?
हजारो श्रमजीवींचा सरकारला सवाल
दिल्लीच्या लाल किल्ल्याला स्वातंत्र्य मिळाले, आदिवासींना मिळणार कधी?
आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांचा सवाल
मोखाडा, ता. १० (बातमीदार) : पुढील वर्षी देशाला स्वतंत्र होऊन ८० वर्षे पूर्ण होणार आहेत. तर, हे सरकार २०१७ मध्ये विकसित भारताचे स्वप्न बघत आहे; मात्र आज येथील आदिवासींना खरे स्वातंत्र्य मिळालेले नाही. आजही पिण्याची पाणी, शिक्षणाची व्यवस्था यासाठी येथील आदिवासी झगडत आहेत. यामुळे स्वातंत्र्य फक्त दिल्लीतील लाल किल्ल्याला न मिळता येथील नागरिकांनादेखील मिळायला हवे, असे प्रतिपादन आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष तथा श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माजी आमदार विवेक पंडित यांनी मोखाडा येथे केले. या वेळी संघटनेच्या अध्यक्षा सिता घाटाळ, विजय जाधव, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, मोखाडा तालुका सचिव ईश्वर भामरे, पांडू मालक यांसह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघटना माझा श्वास, लोकांसाठी मंत्रिपदावर लाथ मारीन
मला माझ्या लोकांसाठी लढायचे आहे. त्यांच्या समस्या सुटणार नसतील तर मला आंदोलन करावेच लागेल. मला मिळालेल्या मंत्रिपदाला लाथ मारावी लागली तरी बेहत्तर. संघटना हा माझा श्वास आहे. त्याशिवाय मी जगू शकत नाही, अशी आपली ठाम भूमिका पंडित यांनी या वेळी स्पष्ट केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.