हेरॉईन तस्करीप्रकरणी टोळीविरोधात मकोका

हेरॉईन तस्करीप्रकरणी टोळीविरोधात मकोका
Published on

हेरॉईन तस्करीप्रकरणी टोळीविरोधात मकोका

कल्याण, ता. १० (वार्ताहर) ः हेरॉईन तस्करीप्रकरणी कल्याण पोलिसांनी संघटित टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली आहे. महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात आरोपी संघटितपणे अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याचे उघड झाल्यानंतर मकोकाची कलमे वाढविण्यात आली.
पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले, की पोलिसांनी आरोपींकडून ९.७६८ किलो हेरॉईन, २९ हजार रुपये रोख आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त हेरॉईनची किंमत सुमारे ३४ कोटी १८ लाख ४५ हजार रुपये आहे. तपासात कुख्यात आरोपी अमजद युसूफ पठाण याचा अमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याचे उघडले आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार अमजद पठाणविरुद्ध महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशात हत्या, मारामारी, दंगल तसेच अमली पदार्थांची तस्करी यांसह २० गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०२० मध्ये हत्या प्रकरणात तसेच २०२५ मध्ये कोनगाव पोलिस ठाण्यातील अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात त्याच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई झाली होती. या प्रकरणात कासिम अब्दुल सत्तार वसईकर, कृष्णा नागप्पा हळेमणी, गणेशन पुथुस्वामी ऊर्फ अण्णा, सद्दाम गफूर शेख आणि अमजद पठाण यांना अटक करण्यात आली होती. मकोकची कलमे वाढवल्यानंतर अमजद, कासिम आणि कृष्णा यांना ८ सप्टेंबरला पुन्हा अटक करण्यात आली. ठाणे विशेष मकोका न्यायालयाने तिघांना १७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक होनमाने करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com