

आयआयटी विद्यार्थ्याच्या आत्महत्याप्रकरणी विद्यार्थी संघटना आक्रमक
आंदोलकांना ताब्यात घेताना पोलिसांशी झटापट
चेंबूर, ता. २१ (बातमीदार) : पवई येथील आयआयटी बी.टेक. विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येच्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी विविध विद्यार्थी संघटना आणि मुंबई युवक काँग्रेसतर्फे आज आयआयटीच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला.
पवई आयआयटीमध्ये बी.टेक. विद्यार्थी साहिल वाकोडे याचा शुक्रवारी (ता. १८) पवई येथील आयआयटी मुंबईच्या होस्टेलमध्ये मृतदेह आढळून आला. त्याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करण्यात यावी आणि त्याला योग्य न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान यापूर्वी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या छायाचित्रांसमोर मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. विद्यार्थी आत्महत्यांच्या घटनांची गांभीर्याने चौकशी करून संस्थात्मक पातळीवर आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
साहिल वाकोडे याच्या आत्महत्येला जातीयवाद आणि संस्थात्मक छळ कारणीभूत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केल्याचे युवक काँग्रेसकडून सांगण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
माजी विद्यार्थी संदीप सावरकर यांनी संस्थेतील विद्यार्थ्यांवरील कथित कारवाईच्या काही पूर्वीच्या घटनांचा उल्लेख केला. तसेच प्राध्यापक सूर्यनारायण डूललाच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला.
आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.
या आंदोलनात आयआयटीचे काही माजी विद्यार्थी, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.