पेप्सिकोच्या उत्पादनांत बदल

पेप्सिकोच्या उत्पादनांत बदल
Published on: 

पेप्सिकोच्या उत्पादनांत बदल
कमी साखरेची पेये, भरडधान्यांच्या स्नॅक्सवर भर

नवी दिल्ली, ता. १३ : ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी आणि आरोग्याबाबत वाढती जागरूकता लक्षात घेऊन पेप्सिको इंडिया आपल्या खाद्यपदार्थ आणि पेयांच्या उत्पादनांमध्ये बदल करत आहे. कमी आणि शून्य साखर असलेली पेये, संपूर्ण धान्ये आणि भरडधान्यांपासून तयार केलेल्या स्नॅक्सचे पर्याय वाढविण्यावर कंपनीचा भर आहे.

कंपनीच्या एकूण पेय उत्पादनांपैकी ७० टक्क्यांहून अधिक उत्पादने शून्य साखर किंवा मध्यम कॅलरी असलेली आहेत. हे प्रमाण टप्प्याटप्प्याने ९० ते १०० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. पेप्सी ब्लॅक, ७अप झीरो शुगर, गेटोरेड झीरो आणि निंबूझ यांचा या पर्यायांमध्ये समावेश आहे. खाद्यपदार्थांच्या श्रेणीत क्वेकर उत्पादनांमधील प्रथिने, तंतुमय पदार्थ आणि संपूर्ण धान्यांच्या गुणधर्मांवर भर देण्यात आला आहे. रेड रॉक डेलीच्या भाजून तयार केलेल्या प्रकारांमध्ये ४० टक्के कमी चरबी असल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच भरडधान्यांपासून तयार केलेले कुरकुरे ज्वारी पफ्स हे उत्पादन सादर करण्यात आले आहे. लेज, कुरकुरे, डोरिटोस, चीटोज, अंकल चिप्स, क्वेकर आणि रेड रॉक डेलीच्या तयार खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम स्वाद किंवा रंग वापरले जात नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. उत्पादनांच्या पाकिटांवर पोषणमूल्यांची माहितीही दिली जाते. ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध करून देताना उत्पादनांची चव आणि आनंद कायम राखण्यावर भर असल्याचे पेप्सिको इंडियाच्या यशिका सिंह यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com