

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरण संसदेत मांडणार!
खासदार वर्षा गायकवाड यांचा इशारा; न्याय मिळत नसल्याचा आरोप
चेंबूर ता. १८ (बातमीदार)ः आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येच्या प्रकरणाला एक महिना उलटूनही कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी रविवारी (ता. १८) आयआयटी मुंबईला भेट देऊन साहिलला श्रद्धांजली अर्पण केली. तसेच, कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मुद्दा संसदेत उपस्थित करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
साहिलला न्याय मिळावा म्हणून गेल्या महिनाभरापासून आई-वडील न्यायासाठी आंदोलन करीत आहेत, मात्र अद्याप कोणत्याही वरिष्ठ अधिकारी किंवा मंत्र्याने त्यांची भेट घेतली नाही. आयआयटीच्या परिसरात प्रवेश करण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. या प्रकरणात प्रशासनाची भूमिका काय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच अनिकेत अंबोरे या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनीही न्यायाची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांवर हात उचलल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. साहिल वाकोडे प्रकरणात हस्तक्षेप करून कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे दोन वेळा पत्राद्वारे केली आहे, मात्र अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा गायकवाड यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.