

दसऱ्यासाठी आपट्याच्या पानांची आवक
जुनी परंपरा जपण्यासाठी श्रीवर्धनची बाजारपेठ सज्ज; फांदीच्या जुडीचा भाव २० रुपये
श्रीवर्धन, ता. १९ (वार्ताहर) : स्नेह, आपुलकी आणि नात्यांमधील गोडवा वाढविणाऱ्या विजयादशमीच्या सणासाठी श्रीवर्धनची बाजारपेठ सज्ज झाली आहे. दसऱ्यानिमित्त एकमेकांना ‘सोनं घ्या, सोन्यासारखं राहा’ म्हणत आपट्याची पाने देण्याची परंपरा आजही कायम आहे. बाजारपेठेत पानांची आवक सुरू झाली असून, एका फांदीच्या जुडीचा दर २० रुपये आहे.
हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याला विशेष महत्त्व आहे. सायंकाळी सीमोल्लंघनानंतर आपट्याची पाने देवाला अर्पण केली जातात. त्यानंतर नातेवाईक, मित्र आणि परिचितांना ही पाने देऊन शुभेच्छा दिल्या जातात. राग-लोभ आणि कटुता विसरून नात्यांमध्ये स्नेह वाढविण्याचा संदेश या परंपरेतून दिला जातो.
दसऱ्याच्या एक-दोन दिवस आधीपासून ग्रामीण भागातील शेतकरी आणि आदिवासी महिला आपट्याची पाने विक्रीसाठी बाजारपेठेत आणतात. एका जुडीमागे २० रुपये मिळत असल्याने विक्रेत्यांचे उत्पन्न मर्यादित राहते. तरीही या हंगामी व्यवसायातून त्यांना काही प्रमाणात रोजगार मिळतो.
वृक्षसंवर्धनाचीही गरज
डिजिटल शुभेच्छांचा वापर वाढला असला, तरी प्रत्यक्ष भेटून आपट्याची पाने देण्यातील आपुलकी कायम आहे, मात्र पाने गोळा करताना झाडांच्या फांद्यांची अनावश्यक तोड टाळून वृक्षांचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.