

इमरानच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी
मुंबई, ता. २६ : मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्धच्या निदर्शनात सहभाग घेऊन परदेशी नागरिक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी बजावलेल्या नोटिशीला आव्हान देणारा अभिनेता इमरान खानच्या याचिकेवर सोमवारी (ता. २६) सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे इमरानच्या याचिकेवर केंद्र सरकारच्या विनंतीमुळे मंगळवारी सुनावणी होणार आहे.
इमरानला देश सोडण्यासाठी परदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाने (फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस) २८ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. त्याविरोधात इमरान केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी त्याच्या वतीने मागील आठवड्यात करण्यात आली होती. मुख्य न्या. महेश चंद्र त्रिपाठी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर इमरानची याचिका सुनावणीसाठी आली. केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर तुषार मेहता यांनी या याचिकेवर मंगळवारी सुनावणी घेण्याची केलेली विनंती न्यायालयानेही मान्य करून याचिकेवर मंगळवारी सुनावणी ठेवली. सोमय्यांच्या तक्रारीनंतर परदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाने इमरानला नोटीस बजावून२८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले होते. इमरानने या नोटिशीला आव्हान दिले असून याचिकेत परदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाने त्याला पाठवलेल्या नोटिशीला बेकायदेशीर, चुकीची, अत्यंत कठोर आणि कायद्याच्या दृष्टीने अयोग्य असे म्हटले आहे. तसेच ही नोटीस रद्द करण्याची आणि अंतरिम दिलासा म्हणून तिच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची मागणीही त्याने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.