नोंदणीकृत रिअल इस्टेट एजंट होण्यासाठी सोमवारपासून प्रशिक्षण

नोंदणीकृत रिअल इस्टेट एजंट होण्यासाठी सोमवारपासून प्रशिक्षण

पुणे, ता. २० : महारेराची अधिकृत प्रशिक्षण संस्था असणाऱ्या‘एसआयआयएलसी’तर्फे महारेराने बंधनकारक केलेले प्रशिक्षण येत्या सोमवारपासून (ता. २४) सुरू होत आहे. २० तासांच्या ऑनलाइन तसेच तीन दिवसांच्या ऑफलाईन प्रशिक्षणाद्वारे एजंटना महारेरातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सक्षम केले जाईल. ‘महारेरा’ने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त डिजिटल मार्केटिंग व वास्तुशास्त्र या विषयांच्या कार्यशाळा प्रशिक्षणात होणार आहेत.
नोंदणीकृत रिअल इस्टेट एजंट होण्यासाठी हे प्रशिक्षण बंधनकारक आहे. नोंदणीकृत एजंटमार्फतच मालमत्ता खरेदी करावी, असे ‘महारेरा’ने केलेले आवाहन व नोंदणीकृत नसणाऱ्या एजंटवर दंडात्मक कारवाई करण्याचे दिलेले निर्देश पाहता लवकरात लवकर हे प्रशिक्षण एजंटनी पूर्ण करणे गरजेचे आहे. लवकरच महारेरातर्फे होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आजच प्रवेश निश्चित करावा. प्रतिव्यक्ती शुल्क पाच हजार अधिक जीएसटी.
अधिक माहितीसाठी संपर्क ः ९१३००७०१३२, ८९५६३४४४७५, ७३५०००१६०३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com