डेक्कन, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आज रद्द!
Railway News:sakal

Railway News: डेक्कन, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आज रद्द!

पुणे-मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत |

Pune News: पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर रविवारी (ता. ९) कामशेत ते तळेगाव दरम्यान पुलाचे काम केले जाणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने मेगा ब्लॉक घेतला असून, त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होणार आहे. पुणे-मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

तर पुणे-लोणावळा दरम्यान सहा लोकलची सेवा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे रविवारी प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
पुणे-लोणावळा मार्गावर कामशेत-तळेगाव दरम्यान असलेल्या पूल क्रमांक १५४/१ येथे लोखंडी गर्डर काढून त्याजागी आरसीसीचे सहा सेगमेंटल बॉक्स बसविले जाणार आहे. या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

 डेक्कन, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आज रद्द!
Paschim Railway : पश्चिम रेल्वेवर फुकटे वाढले! दोन महिन्यात तब्बल 38 कोटी 3 लाखांचा दंड वसूल

‘या’ लोकल रद्द...
०१५६४ पुणे-लोणावळा
०१५६१ लोणावळा-पुणे
०१५६३ लोणावळा-शिवाजीनगर
०१५६६ पुणे-लोणावळा
०१५८८ शिवाजीनगर-तळेगाव
०१५८९ तळेगाव-पुणे

 डेक्कन, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आज रद्द!
Central Railway Mega Block : मेगा ब्लॉकचा मेल-एक्सप्रेसच्या प्रवाशांना सर्वाधिक फटका; मुंबई गाठण्यासाठी अतोनात हाल

‘या’ गाड्या उशिराने धावणार...
चेन्नई-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस - साडेतीन तास
मुंबई-चेन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेस - ३० मिनिटे
लोकमान्य टिळक टर्मिनस-काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेस - १५ मिनिटे
तिरुअनंतपुरम मुंबई-एक्स्प्रेस - १५ मिनिटे
दौंड-इंदूर एक्स्प्रेस - १५ मिनिटे

 डेक्कन, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आज रद्द!
Diva Panvel Railway: नवी मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, हे रेल्वे फाटक लवकरच होणार बंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com