वीटभट्टी व्यावसायिक संकटात

वीटभट्टी व्यावसायिक संकटात

रसायनी, ता. ३१ (रायगड) ः निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका यंदा वीट व्यवसायाला बसला आहे. विटांच्या मागणीत घट, त्‍यात अवकाळीमुळे भट्ट्यांचे वारंवार झालेल्‍या नुकसानीमुळे व्यावसायिकांनी हात आखडता घेतला आहे. आता पावसाळा जवळ आल्‍याने पुन्हा वीट भट्ट्या थंडावणार आहेत. दरम्यान पुढील काही महिन्यांत भाव वाढण्याची शक्यता असल्याने व्यावसायिकांनी तयार विटांचा साठा करून ठेवला आहे.
रसायनी परिसरातील वडगाव, मोहोपाडा, चावणा, आपटे पंचक्रोशीत अनेक वीटभट्ट्या आहेत. पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात कारखाने, रसायनी, पनवेल, नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायिकांकडून विटांची मागणी असते. सिमेंट काँक्रिटचे विटांमुळे मातीच्या विटांची मागणी आधीच कमी झाली आहे, त्‍यात हवामान बदलाचा फटका व्यावसायिकांना बसला आहे.
दरम्यान कच्च्या मालाच्या किमतीत तसेच मजुरीत होणारी वाढ, आर्थिक मंदी, चार-पाच वर्षांपासून बसणारा निसर्गाचा लहरीपणाचा फटका यामुळे वीट व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.

एक भट्टीत विटा तयार करण्यासाठी २०-२५ दिवस लागतात. यंदा डिसेंबरपासून हवामान बदलाचा फटका बसला आहे. त्‍यात मार्च, एप्रिल, मे महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्‍यामुळे मोठे नुकसान झाले. मागणी कमी, त्‍यात भावही मिळत नसल्‍याने महिनाभरापूर्वी वीट भट्टी व्यवसाय बंद केला.
- हरिचंद्र कडपे, तळेगाव, वीट व्यवसायिक

अवकाळी पावसामुळे कच्चा मालाचे नुकसान झाले. तसेच तुस, दगडी कोळसा, माती, पाणी या वस्तूच्या दरात तसेच मजुरीत वाढ झाली आहे. विटांची मागणी कमी झाल्याने भावही कमी झाला आहे. त्‍यामुळे पावसाळ्यापूर्वीच १०-१२ दिवस कारखाना बंद केला आहे.
- विलास माळी, वावेघर, वीट व्यवसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com