रविवार असूनही प्रचारात रंगत आली नाही.

रविवार असूनही प्रचारात रंगत आली नाही.

Published on

प्रचाराचा सुपर संडे शांततेत
राजकीय सभा, रॅली नाहीच
रेवदंडा, ता. १ (बातमीदार) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी येत्या ८ फेब्रुवारीला मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी अवघे काही दिवस उरले असताना रविवारी (ता. १) रेवदंडा-चौल परिसरात राजकीय प्रचाराचा उत्साह दिसून आला नाही.
रविवारची सुट्टी असल्याने मतदार घरीच असतात. मतदार घरात, पण प्रचारक रस्त्याबाहेर ही संधी साधून उमेदवार जोरदार शक्तिप्रदर्शन करीत असतात. रेवदंड्यात मात्र चित्र वेगळे होते. सहसा सुट्टीच्या दिवशी होणाऱ्या मोठ्या प्रचारफेऱ्या आणि नेत्यांच्या सभांऐवजी गावात शांतता पाहायला मिळाली. कोठेही मोठी रॅली किंवा पदयात्रा निघाली नाही. काही उमेदवारांच्या निशाण्या आणि फोटो लावलेली वाहने फिरताना दिसत होती. तसेच जागोजागी राजकीय फलक झळकत होते.
नागरिकांमध्येही उत्साह दिसत नसून पाणी, रस्ते, सांडपाणी, कचरा या प्रश्नांचे रडगाणे सुरूच असल्याने आम्हाला काय फरक पडतो निवडणुकीचा, असा विचार ते करीत असल्याचे म्हटले जात आहे. काही उमेदवार मात्र विकासाची भूमिका मांडताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com