जड वाहनांवरील टोलमध्ये वाढ, वाहतुकदारांकडून निर्णयाचा निषेध !

कृष्ण जोशी
Friday, 20 November 2020

महाराष्ट्रातील महामार्गांवर मोठ्या व्यापारी वाहनांवर आकारण्यात येत असलेल्या टोलच्या रकमेत दहा टक्के वाढ करण्याच्या सरकारच्या निर्णयास ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने विरोध केला आहे. 

मुंबई, ता. 20  : महाराष्ट्रातील महामार्गांवर मोठ्या व्यापारी वाहनांवर आकारण्यात येत असलेल्या टोलच्या रकमेत दहा टक्के वाढ करण्याच्या सरकारच्या निर्णयास ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस ने विरोध केला आहे. 

राज्य सरकारने नुकताच यासंदर्भात निर्णय घेतला आहे. छोट्या वाहनांना टोलमधून सूट मिळते किंवा त्यांना कमी दराने टोल द्यावा लागतो. त्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी सरकार मोठ्या वाहनांना जादा टोल आकारते, ही बाब चुकीची असल्याचे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस च्या कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मलकीतसिंह यांनी म्हटले आहे.  

एकतर सध्या कोरोनाच्या फैलावामुळे वाहन चालकांचा धंदा कमी झाला आहे. इंधनाचे व अन्य करांचे वाढते दर व त्याचवेळी घटते उत्पन्न यामुळे वाहनचालक-मालक त्रासून गेले आहेत. अशा स्थितीत या निर्णयाचा मोठाच फटका मोठ्या वाहनचालकांना बसणार आहे. कोरोना काळात जसे सरकारने छोट्या वाहतुकदारांना टोलमध्ये सवलत दिली, तशीच सवलत मोठ्या वाहतूकदारांनाही द्यावी. तसेच टोलवाढीचा निर्णय मागे घ्यावा, अशीही मागणी मोटर ट्रान्सपोर्ट ने केली आहे.

याही बातम्या वाचा : 

>> ३१ डिसेंबरपर्यंत महापालिका, सरकारी आणि सर्व खासगी शाळा बंदच राहणार, इकबाल सिंह चहल यांचा निर्णय

>> कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकेत; मुंबई दिल्ली मुंबई रेल्वे सेवा आणि विमान सेवा बंद ?

>> पवारसाहेब, "मराठा स्त्रीला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री करायची भूमिका तुम्ही घेतली तर त्याला समर्थन"

>> भाजपने आतापासूनच उठाबशा काढल्या तर निदान थोडीफार मजल गाठता येईल, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला!

>> 26/11 दहशतवादी हल्ला : पोलिस आयुक्तालयात उभे राहतेय भव्य शहीद स्मारक

( संपादन - सुमित बागुल )

toll rates increased for heavy vehicles transporters organization unhappy over decision


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: toll rates increased for heavy vehicles transporters organization unhappy over decision