कळंबोली : आश्रमात मुलांवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

पनवेल - कळंबोलीतील अनाथ व निराश्रीत मुलांसाठी असलेल्या ग्यान आश्रममधील तिघा सावत्र भावांवर त्याच आश्रमातील तिघा केअरटेकर तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणातील तिघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

पीडित मुलांमध्ये १८, १२ आणि ११ या वयोगटांतील मुलांचा समावेश आहे. यातील सगळ्यात मोठा मुलगा हा गतिमंद आहे. या मुलांच्या आई-वडिलांनी दुसरे लग्न केले आहे. शिक्षणाची व राहण्याची सोय होईल, या उद्देशाने पीडित मुलांच्या आई-वडिलांनी आपल्या तिन्ही मुलांना दोन वर्षांपूर्वी कळंबोली सेक्‍टर-१४ मधील ग्यान आश्रममध्ये ठेवले होते. फेब्रुवारी महिन्यामध्ये आश्रमातील आरोपी केअरटेकरने या तिघांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता, असे तक्रारीत म्‍हटले आहे.

आरोप फेटाळले
पीडित मुलांच्या पालकांनी नवीन घर घेतले आहे. त्यामुळे या मुलांना पुन्हा आश्रमात येण्याची इच्छा नाही. त्यामुळे त्यांनी खोटे आरोप केले आहेत, असे आश्रमातील फादरने म्‍हटले असून, आरोप फेटाळले आहेत.

Web Title: Torture on children in the ashram