मोठी बातमी - एका दिवसात मुंबईत ५९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर !

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 31 March 2020

महाराष्ट्रात आता खासगी लॅब्सना देखील नॉवेल कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या  COVID19 या आजाराची  करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. अशात गेल्या चार दिवसात या खासगी लॅब्समध्ये ज्यांनी कोरोना तपासणी केली आहे आणि ज्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत अशांचा डेटा आता सरकारला प्राप्त झालाय.

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी. कारण ३१ मार्च २०२० रोजी दुपारपर्यंत असणारा २३० चा आकडा आता थेट ३०२ वर जाऊन पोहोचलाय. एकट्या मुबंईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५६ वर गेलीये. एकाच दिवसात महाराष्ट्रात ७७ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकट्या मुंबईतून अवघ्या २४ तासात पाच दहा नाही तर ५६ रुग्ण नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत आहेत. 

मोठी बातमी - SBI मागोमाग 'या' चार बँका पुढील तीन महिने EMI घेणार नाहीत...

त्यामुळेच आजचा दिवस हा मुंबईकरांची चिंता वाढवणारा म्हणावा लागेल. कारण आज  मुंबईचा आकडा अचानक वाढलेला पाहायला मिळतोय. महाराष्ट्रात आता खासगी लॅब्सना देखील नॉवेल कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या  COVID19 या आजाराची  करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. अशात गेल्या चार दिवसात या खासगी लॅब्समध्ये ज्यांनी कोरोना तपासणी केली आहे आणि ज्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत अशांचा डेटा आता सरकारला प्राप्त झालाय. त्यामुळे या आकड्यांना आता सरकारी आकड्यांमध्ये समाविष्ट करण्यात आलंय. त्यामुळेच आता महाराष्ट्रातील आणि प्रामुख्याने मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह केसेसचा आकडा २३० वरून ३०२ वर गेलाय. 

मोठी बातमी - कोरोनामुळे आपल्या आसपास झालेत 'हे' चांगले बदल; बातमी वाचाल तर छान वाटेल... 

आज कुठे किती रुग्ण वाढलेत (प्रभाग निहाय आकडेवारी) 

  • मुंबई - ५९
  • अहमदनगर - ३ 
  • पुणे - २
  • ठाणे - २ 
  • कल्याण डोंबिवली - २
  • नवी मुंबई - २ 
  • वसई विरार- २ 

सरकारी लॅब्स सोबतच आता खासगी लॅब्समध्ये देखील नॉवेल कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या होणाऱ्या COVID19 या आजाराची चाचणी करता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर काही लक्षणं वाटत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोना चाचणी करू शकता.   

total 59 new covid 19 patients found in mumbai in last 24 hours 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: total 59 new covid 19 patients found in mumbai in last 24 hours