Mumbai News: मुंबईकरांना दिलासा! धरणांमध्ये गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक पाणीसाठा; वाचा आकडेवारी
Dam Water Level: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहे. हा पाणीसाठा गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक असून मुंबईकरांना पाण्याच्या बाबतीत दिलासा मिळाला आहे.
मुंबई : अखेर मुंबईकरांना पाण्याच्या बाबतीत मोठा दिलासा मिळाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असून एकूण साठा ९६.५१ टक्के इतका आहे. विशेष म्हणजे, हा पाणीसाठा गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक आहे.