

Mumbai Free Trip on Mahaparinirvan Day
ESakal
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्याच्या पर्यटन विभागातर्फे ३, ४ आणि ५ डिसेंबरला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट’चे आयोजन करण्यात आले आहे. चैत्यभूमीला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी ही सहल निःशुल्क उपलब्ध असून, बाबासाहेबांचे जीवनकार्य, विचार आणि महत्त्वपूर्ण स्थळांची ओळख करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.