माथेरानमध्ये पर्यटनाला चालना मिळणार

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्‍याशी चर्चा करताना खासदार श्रीरंग बारणे
केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्‍याशी चर्चा करताना खासदार श्रीरंग बारणे

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे 2003 मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने माथेरान परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर केला. त्यामुळे माथेरानवरील निर्बंध दूर करण्यासाठी नवी दिल्लीत शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची गुरुवारी भेट घेतली. या भेटीदरम्यान इको सेन्सेटिव्ह झोनच्या कायद्यात बदल करण्याचे आश्‍वासन केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांनी खासदार बारणे यांना दिले.

माथेरानकरांच्या प्रतीक्षेत असलेली ई-रिक्षा सुरू करण्यासाठी पर्यावरण विभागाच्या अडचणी दूर करणे, तसेच माथेरानमध्ये साहसी खेळांना प्रोत्साहन देण्यासोबतच रोजगारनिर्मितीला चालना देण्याचा सरकारचा विचार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. 

माथेरानमध्ये इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये अनेक निर्बंध लावण्यात आले होते. यासाठी खासदार श्रीरंग बारणे तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे नवी दिल्ली येथे संसद भवनात केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी (ता.1) बैठक बोलाविली होती.

त्यावेळी खासदार बारणे यांच्यासह माथेरान गिरीस्थान परिषदेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, नगरपरिषदचे गटनेते प्रसाद सावंत यांनी इको सेन्सेटिव्ह झोनच्या निर्बंधांमुळे होणाऱ्या अडचणींची माहिती दिली. या बैठकीत माथेरानचे प्रश्‍न तत्काळ सोडविले जातील, असे आश्‍वासन केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांनी दिले. 

माथेरानमधील जमिनीची धूप रोखण्यासाठी तज्ज्ञांकडून पाहणी करून त्याचा अहवाल मंत्रालयाकडे मागवून घेण्यात येणार आहे. त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. माथेरानमधील कचरा उचलण्यासाठी पालिकेची ट्रॅक्‍टर वापरण्याची मागणी त्यांनी मंजूर केली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com