

Toyota kirloskar ITI contracts
ESakal
मुंबई : राज्यातील शासकीय ४५ आयटीआयमध्ये पहिल्यांदाच टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनीकडून (एलएमव्ही) हलके वाहन तंत्रज्ञ अभ्यासक्रमांसाठी सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी केली जाणार आहे. यासाठी आज मंत्रालयात कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नावीन्यतामंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.