
मुंबई, ता.16 : गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत एसटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस वाढली होती. अखेर एसटी च्या मान्यताप्राप्त कामगार संघटनेने राज्यभरात सर्वच जागेवर विजय मिळवला होता. तर, दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र एसटी वर्कर्स (इंटक) संघटनेच्या क्रांती पॅनलला समाधान मानावे लागले होते. त्यामुळे यावर्षी मान्यता प्राप्त एसटी कामगार संघटनेच्या पॅनल विरोधात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांनी आपली बांधणी सुरू केली असल्याचे दिसते आहे.
एसटी बँकेच्या संचालक मंडळाची 27 मे 2020 रोजीच मुदत संपली आहे. मात्र त्यांनतर कोरोनाची महामारीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक घेणे शक्य नसल्याने राज्य सरकारने मुदत संपलेल्या सहकारी संस्थांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनतर आता कोरोना परिस्थिती थोड्या प्रमाणात मावळल्याने आणि अनलॉक परिस्थिती असल्याने सहकार संस्थांना फेब्रुवारी ते मार्च दरम्यान निवडणुका घेण्यासाठी मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
त्यापूर्वीच एसटीतील कर्मचारी संघटनांनी आपापली तयारी सुरू केली असून, सध्या एसटीच्या मान्यताप्राप्त राज्य एसटी कामगार संघटनेच्या विरोधात सर्व संघटनांचा सूर दिसून येत आहे. एसटी बँकेमध्ये 70 हजारांपेक्षा जास्त मतदार असून 19 संचालक पदांसाठी ही निवडणूक घेतली जाते. यामध्ये
2 महिला ओपन, एक अनुसूचित जाती, एक ओबीसी , एक भटक्या विमुक्त जाती जमाती असे राखीव असतात तर इतर 15 जागा ओपन संवर्गासाठी असतात.
Trade unions active for ST Bank elections program likely to be announced soon
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.