जीएसटीसंदर्भात व्यापाऱ्यांची न्यायालयात याचिका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

केंद्र सरकारने लागू केलेल्या वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीबाबत सागरी मार्गाने आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. 

मुंबई - केंद्र सरकारने लागू केलेल्या वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीबाबत सागरी मार्गाने आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. 

देशात सागरी मार्गाने येणाऱ्या व्यावसायिक वाहतुकीमध्ये आयातदार, निर्यातदार आणि संलग्न सेवा पुरविणारे असे वर्गीकरण केंद्र सरकारने जीएसटी अधिसूचनेद्वारे केले आहे. यानुसार आयातदाराला परदेशी कंपनीचा सेवा कर द्यावा लागतो आणि येथील सीमाशुल्क व अन्य करही द्यावे लागतात. त्यामुळे व्यापाऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड पडत असल्यामुळे जीएसटीच्या अंमलबजावणीमध्ये नियमन व्हायला हवे, अशी मागणी याचिकादारांनी केली आहे. याचिकेवर 19 जून रोजी नियमित न्यायालयात सुनावणी होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traders court petition in relation to GST