

Palghar Fishermen Demand SIT Probe
sakal
मुंबई : जिल्ह्यातील विविध मच्छिमार संघटनांनी एकत्र येऊन बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बेकायदा मासेमारी आणि अशा मासेमारीला मत्स्यखात्यातील अधिकार्यांकडून मिळणारे अभय तसेच अवैध मासेमारीमुळे सागरी सुरक्षेपुढे निर्माण झालेले आव्हान आदींबाबत पारंपरिक मच्छिमार संरक्षण समितीचे समन्वयक मिल्टन सौदिया यांनी ऊहापोह केला. पर्ससीन मासेमारी आणि तिचा राज्यातील किनार्यावरील पारंपरिक मच्छिमार, समुद्रातील मत्स्यसाठे आणि पर्यावरणावर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी डॉ. सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.