

Hajimalang Yatra
ESakal
उल्हासनगर : हाजीमलंगवाडी येथील श्री पीर हाजीमलंग साहिब दर्गा उरूसाच्या निमित्ताने हजारो भाविकांची गर्दी उसळणार असल्याने, भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत हिललाईन पोलीस ठाण्याने विशेष नियोजन आखले आहे. पालखी व संदलाच्या दिवशी होणारी प्रचंड गर्दी, यंदा सुरू झालेली फ्युनिक्युलर रोप-वे सेवा आणि मलंगगडाची मर्यादित क्षमता लक्षात घेता, २ फेब्रुवारी रोजी ठराविक वेळेत वाहतूक व रोप-वेवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन उल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी भाविकांना केले आहे.