नवरात्र उत्सवामध्ये कल्याणमध्ये वाहतुकीमध्ये बदल

नवरात्र उत्सवामध्ये कल्याणमध्ये वाहतुकीमध्ये बदल

कल्याण : कल्याण पश्चिम मध्ये दुर्गाडी किल्ले येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही 10 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर या कालावधीत दुर्गामाता उत्सव साजरा करण्यात येणार असून यावेळी हजारो नागरीक तेथे दर्शनासाठी येत असतात होणारी गर्दी पाहता दुर्गा माता चौकातील व कल्याण शहरातील वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी नवरात्र उत्सव मध्ये वाहतुकीमध्ये बदल केले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी केले आहे. 

आज (बुधवार) 10 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर या कालावधीत कल्याण पश्चिम मध्ये नवरात्र उत्सव मध्ये दुर्गाडी किल्ले वर दुर्गामाता उत्सव साजरा करण्यात येतो , यावेळी तेथे जत्रेचे स्वरूप आणि नागरिकांची गर्दी पाहता वाहतुक विभागाने कल्याण मधील वाहतुकीमध्ये बदल केले आहे.

कल्याण पश्चिम मधील लालचौकी ते दुर्गामाता चौक मार्गे भिवंडी कडे जाणाऱ्या जड अवजड मालवाहू वाहनास लालचौकी येथे प्रवेश बंदी करण्यात आली असून या वाहनांना पर्यायी मार्ग म्हणून लालचौकीच्या उजव्या बाजूने वळून आधारवाडी चौक गांधारी ब्रिज मार्गे व्हाया पडघा मार्गे भिवंडी कडे जाता येईल. 

भिवंडी कडून दुर्गामाता चौक कडे येणाऱ्या दुर्गाडी चौक येथे बंदी करण्यात आली असून त्यांना पर्याय मार्ग म्हणजे दुर्गा माता चौक च्या डाव्या बाजूने वळून वाडेघर चौक , आधारवाडी चौक, मार्गे मुरबाड रोड हायवे ने अथवा लालचौकी मार्गे इच्छित स्थळी जाता येईल. 

कल्याण पूर्व आणि शिळफाटा मार्गे पत्रिपुलाकडून गोविंदवाडी बायपास मार्गे दुर्गाडी चौकाकडे आणि दुर्गाडी चौक ते गोविंद वाडी बायपास मार्गे पत्रिपुला कडे येणारी लहान वाहने कार आणि रिक्षा वाहनांना सायंकाळी 4 ते रात्री 12 पर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली असून पर्यायी दोन मार्ग असून त्यातील एक म्हणजे जुन्या आग्रा रोडने पत्रिपुल वलीपिर रोड गुरुदेव हॉटेल शिवाजी चौक सहजानंद चौक चौक लालचौकी मार्गे दुर्गाडी येथून इच्छित स्थळी जाऊ शकतात .तसेच दुसरा मार्ग म्हणजे दुर्गाडी येथून लालचौकी सहजानंद चौक शिवाजी चौक गुरुदेव हॉटेल वलीपिर येथून पत्रिपुल मार्गे इच्छित स्थळी जातील . हा बदल नवरात्र आणि दसरा या कालावधीसाठी असून यात रुग्णवाहिका , अग्निशमन दलाच्या गाड्या , पोलीस वाहने आणि अत्यावश्यक वाहनांना बंदी नसून नवरात्र काळात पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक पोलिसाना सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com