खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

तुर्भे - दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे एमआयडीसीतील दुरवस्था झालेल्या रस्त्यांना नदीचे रूप आले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांत मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने डबकी तयार झाली आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

तुर्भे - दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे एमआयडीसीतील दुरवस्था झालेल्या रस्त्यांना नदीचे रूप आले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांत मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने डबकी तयार झाली आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

महापालिकेने यंदा समाधानकारक नालेसफाई केली नसल्याने त्याचा फटका औद्योगिक वसाहतीला बसला आहे. याशिवाय आजूबाजूच्या वस्त्यांनाही यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. एमआयडीसीत तीन ते चार हजार लहानमोठे कारखाने आहेत. जवळपास दोन लाखांपर्यंत येथे कामगार आहेत. त्यामुळे या परिसरात वाहनांची मोठी वर्दळ असते. विशेषत: कच्च्या आणि पक्‍क्‍या मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांचे प्रमाण येथे मोठे आहे. यात मोठे ट्रक, टेम्पो, कंटेनर, टॅंकर आणि खासगी वाहनांचा समावेश आहे. आशियातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या एमआयडीसीत पायाभूत सुविधांच्या वानवा आहेत. रस्त्यांची तर पुरती वाताहत झाल्याने उद्योजकांनी चिंता व्यक्त केली आहे. औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांबरोबरच मुख्य रस्तेही पावसामुळे उखडले आहेत. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहतुकीचा वेग मंदावला.

महापालिका उद्योजकांकडून कर घेते. त्यामुळे येथे पायाभूत सुविधा देणे अपेक्षित आहे; परंतु त्या दिल्या जात नसल्याचा उद्योजकांचा आरोप आहे. पावसाने एमआयडीसीला पुरते धुवून काढले आहे. अनेक ठिकाणी नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्याने झोपडपट्टीवासीयांचा मार्गच बंद झाला आहे.
- के. आर. गोपी, अध्यक्ष, स्मॉल स्केल इंडट्रीज असोसिएशन

Web Title: Traffic jam due to pits